ग्रामपंचायत निमोण

तालुका: संगमनेर | जिल्हा: अहिल्यानगर | राज्य: महाराष्ट्र

स्मार्ट गाव, सशक्त नागरिक

विकसीत गाव
विकसीत भारत!


माननीय मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

श्री. एकनाथ शिंदे

ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री
महाराष्ट्र राज्य

श्री. जयकुमार गोरे

ग्रामविकास

ग्रामविकास अधिकारी

श्री. आत्माराम मरकड

सरपंच

सरपंच

श्री. संदिप देशमुख

उपसरपंच

श्री. रामकृष्ण गाडेकर

🌿निमोण ग्रामपंचायत🌿


निमोण ग्रामपंचायत

निमोण हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तहसीलमध्ये वसलेले एक गाव आहे. हे संगमनेर (तहसीलदार कार्यालय) पासून २० किमी आणि अहिल्यानगर जिल्हा मुख्यालयापासून १०० किमी अंतरावर आहे. अहिल्यानगरच्या चैतन्यशील प्रदेशात निमोणचे स्वतःचे स्थान आहे.

🎯गावाची दृष्टी :

गावातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास करून गाव स्वच्छ, निरोगी, आत्मनिर्भर आणि आदर्श गाव म्हणून घडवणे.

🎯 गावाचे ध्येय :

ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवणे. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, महिला व बालविकास यांना चालना देणे. ग्रामविकासासाठी लोकसहभाग व पारदर्शक कारभार ठेवणे. पर्यावरण संवर्धन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन व हरितग्राम संकल्पना राबवणे.

4973

एकूण लोकसंख्या

2556

पुरुष

2417

माहिला

🌿ग्रामविकास संदेश 🌿

Sarpanch

सरपंच : संदीप भास्करराव देशमुख

सरपंच संदीप भास्करराव देशमुख यांचा ग्रामविकास संदेश

ग्रामपंचायत ही आपल्या देशातील ग्रामीण लोकशाहीचा खरा पाया आहे. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शाळा, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सोयी-सुविधांची जबाबदारी ही आपल्या ग्रामपंचायतीवर असते. ग्रामपंचायत म्हणजे केवळ विकासाचे कार्यालय नाही, तर गावकऱ्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणारी खरी जनतेची संस्था आहे.

माझं ध्येय एक समृद्ध, स्वच्छ, सशक्त आणि आत्मनिर्भर गाव घडवण्याचं आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, शेतीतील नवीन तंत्रज्ञान, महिला व युवक सबलीकरण आणि पायाभूत सुविधा यावर विशेष भर देऊन, आपण सारे मिळून गावाला आदर्श आणि प्रगतिशील बनवूया. चला, एकत्र येऊन आपल्या गावाच उज्वल भविष्य घडवूया.

✨गावाचा अभिमान✨
१५१ फूट उंचीचा राष्ट्रध्वज

निमोण ग्रामपंचायतीने गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी १५१ फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारून एक अभिमानास्पद पाऊल उचलले आहे. हा भव्य ध्वज गावाच्या एकतेचे आणि देशभक्तीचे प्रतीक ठरला आहे. आज तो निमोणच्या प्रगतीची ओळख बनला आहे.



Indian Flag

🌿योजना / उपक्रम🌿

जलयुक्त शिवार अभियान 2.0

"थेंब थेंब साचला, गाव समृद्ध झाला!!!"

पाण्याची योग्य साठवण आणि वापर केल्यास शेती, पर्यावरण आणि जीवनशैली सुधारते. जलसंधारण हे गावाच्या समृद्धीचे मूलभूत पाऊल आहे.


Jalyukta Shivar Abhiyan

🌿धार्मिक स्थळे🌿

🚩 हनुमान मंदिर

गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले हे मंदिर गावदेवतेचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गावातील धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची सुरुवात नेहमीच या मंदिरातील पूजेनंतर होते. गावकऱ्यांच्या एकोपा आणि श्रद्धेचे हे मंदिर एक महत्त्वाचे केंद्र आहे.

🚩 श्री जगदंबा माता मंदिर

निमोण गावातील हे मंदिर प्राचीन मंदिर असून प्रसिद्ध धार्मिक स्थळ देखील आहे. दरवर्षी येथे नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. यात्रेच्या काळात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते.
जगदंबा माता मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, सुशोभीकरण आणि ग्रामविकासाची कामे सुरू आहेत.

🚩 बुवाजी बाबा मंदिर

हे मंदिर निमोण गावातील श्रद्धेचे प्रमुख केंद्रस्थान आहे. बुवाजी बाबा हे स्थानिक संत स्वरूपातील पूजनीय व्यक्तिमत्त्व मानले जातात. दरवर्षी पालखी, कीर्तन आणि उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात. गावकरी आणि भाविक येथे दर्शन घेऊन मन:शांती आणि आशीर्वाद प्राप्त करतात. या मंदिरामुळे गावात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाले आहे.

🚩 श्री साईबाबा चरण पादुका

मंग गावात श्री साईबाबांच्या चरण पादुका पवित्र स्थळ म्हणून स्थापित आहेत. गावकरी आणि भाविक यांना या पादुकांमध्ये शिर्डी साईबाबांच्या उपस्थितीचा अनुभव मिळतो. दरवर्षी साईपालखी, कीर्तन आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन होते. दूरदूरून भाविक येथे येऊन दर्शन घेतात आणि अध्यात्मिक शांती अनुभवतात. पादुका स्थळ परिसरात नेहमीच श्रद्धा, भक्तिभाव आणि शांततेचे वातावरण असते.

🖼️ फोटो गॅलरी 🖼️

Back To Top